बळीराजा 1 फेब्रुवारी रोजी ‘पायी मार्च’ काढणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी घोषणा केली आहे की, आंदोलक शेतकरी 1 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवरून संसदेच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून आम्ही संसदेला धडकणार आहोत, अशी माहिती क्रांतिकारी किसान यूनियनचे नेते दर्शन … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत असल्याचे अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, जिल्ह्यात १४ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीची … Read more

अन् शेतकऱ्याने तीन एकर फ्लॉवर पिकावर फिरवला रोटर

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील कुळधरण जवळील सुपेकरवाडीतील शेतकरी  बिभीषन अंबादास सुपेकर यांनी आपल्या तीन एकरमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. मात्र सध्या फ्लॉवरला भाव नसल्याने या सर्व पिकावर त्यांनी रोटर मारला. बिभीषन सुपेकर यांनी आपल्या शेतात तीन एकर फ्लॉवर लावला होता. यासाठी त्यांना एकरी वीस हजार रुपये खर्च खर्च आला होता, आपला … Read more

मध्य प्रदेशातील बटाटा शेतकऱ्यांनी केला पेप्सीकोशी करार,दर किलोला मिळाला उच्चांकी दर

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- नवीन कृषी कायद्यांच्या विरोधामुळे मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील शेतक्यांनी बटाटा चिप्स बनविणाऱ्या कंपनीशी करार केला.आंतरराष्ट्रीय कंपनी असणाऱ्या असणाऱ्या पेप्सीकोशी शेतकऱ्यांनी करार केला आहे. कंपनी येथे 10 शेतकर्‍यांकडून बटाटे खरेदी करणार आहे. या करारानुसार कंपनी 11.40 रुपये प्रति किलो दराने बटाटे खरेदी करेल. जबलपूर विभागात येणारे सिवनी जिल्ह्यातील शेतकरी … Read more

कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आले चांगले दिवस; सात वर्षांत प्रथमच होऊ शकते ‘असे’काही, वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- बऱ्याच वर्षानंतर यंदा कापूस शेतकर्‍यांचे चांगले दिवस आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. सन 2020-21 मध्ये 2019-20 च्या तुलनेत भारताची कापूस निर्यात 7 दशलक्ष गाठीपर्यंत वाढू शकते, अशी माहिती समोर येत आहे. जर हे घडले … Read more

शेतकऱ्यांनी कांदा मार्केटचे लिलाव बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ उतार होत आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात लिलावात काद्यांला कमी भाव मिळाल्याने कांदा मार्केटचे लिलाव शेतकऱ्यांने बंद पाडले होते. शेवगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी नेहमीप्रमाणे कांद्याची मोठी आवक झाली होती. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, कडा, आष्टी, धामनगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आला होता. दुपारी … Read more

तूर खरेदी नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन

केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदी करीता नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी हनुमंत पवार यांनी केले आहे. जिल्ह्यात २८ डिसेंबर, २०२० पासूनच तूर खरेदी संदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात एकूण १३ खरेदी केंद्रे प्रस्तावित असून ११ खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. शेतमाल नोंदणी करण्यासाठी … Read more

वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना’बुरे दिन ‘

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- विविध भागांत आठवडाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, शेतातील पीक वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या महागड्या औषधाची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वातावरणातील बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून सध्या शेतकऱ्यांना बुरे दिन आल्याचे म्हणावे लागेल. या वर्षी … Read more

शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी दिली. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असून केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवत आहे. केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला या मोठ्या … Read more

शेतकऱ्यांना मिळणार दहा लाख रुपये ; कोठे आणि कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारचे सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन यूपीचे योगी सरकारही बरीच पावले उचलत आहे. आता सरकारचे हे नवीन पाऊल म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देईल. खरं तर पारंपरिक शेतीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे अवघड आहे. त्यामुळे सरकारला सेंद्रिय शेतीला चालना देण्याची इच्छा … Read more

अबब ! कांदा, बटाटा रडवणार ; ‘इतके’ झालेत भाव , वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्षाच्या शेवटच्या भागात कांद्याचे दर वाढले आहेत. बटाटा देखील किचन बजेट बिघडवण्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. डिसेंबरपर्यंत कांदा सामान्य किमतीत मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दिल्लीत कांद्याचा घाऊक दर 15 ते 47.50 रुपये प्रतिकिलो आहे, तर किरकोळ दरात तो 50-70 रुपये किलो दराने विकला जात आहे. वास्तविक … Read more

सरकार कोणत्‍याही पक्षाचे असो, शेतक-यांना मदत ही झालीच पाहीजे

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करतानाच हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या कुटुंबियांना शासन मदतीच्या धनादेशाचे वितरण आ.विखे … Read more

कृषीकन्या वैष्णवी हराळ कडून बियाणांचे मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, सोनई येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्याने गुंडेगाव येथे शेतकर्‍यांना बियाण्यांतील प्रकरांबद्दल कृषिकन्या वैष्णवी हराळ माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने शेतकर्‍यांना सत्यप्रत बियाणे, मूलभुत बियाणे, पायाभूत बियाणे व प्रमाणित बियाणे यांच्या बदल माहिती देऊन त्यांचे महत्व शेतकर्‍यांना … Read more

४० वर्षापासून चिक्कूची बाग ठरतोय शेतकऱ्याचा आधार, दरवर्षी कमी खर्चात मिळतंय लाखोंचं उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आता कापूस, सोयाबीन पिकांकडे पाठ फिरवत, पडीक शेतीवर फळबाग लागवड करण्याकडे मोर्चा वळवला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा, या संकटातुन बाहेर पडण्यासाठी बीडचे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. तर यातूनच लाखोंचं उत्पन्न देखील घेत आहेत अशाच … Read more

‘ह्या’ पोलिसवाल्याची कमाल ; शेतात केलेय ‘असे’ काही,आता वर्षाला कमावतोय 3.3 कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आपल्या देशातील शेतकर्‍यांच्या स्थितीबद्दल सर्वाना चांगले माहिती आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते. पण असे काही शेतकरी आहेत जे काही खास पद्धतीने शेती करून अनोखी कामगिरी बजावतात. त्यातून त्यांना खूप पैसेही मिळतात. आज आपण ज्या शेतकऱ्याविषयी बोलणार आहोत, त्यानेही असेच काही केले आहे. खास … Read more

राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-ऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवण्याची गरज अाहे. या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५ टक्के भाववाढ करावी. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देऊ, परंतु साखर कारखानदार व राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. … Read more

कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; कमी खर्चात मिळणार भरघोस उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यातच अतिवृष्टीमुळे कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! या तीन दिवसांसाठी कांदा मार्केट बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे नेप्ती येथील कांदा लिलाव आजपासून पुढील तीन दिवस (दि.१२ ते १४) होणारे कांदा लिलाव दीपावली सणानिमित्त होणार नाहीत. सदरचे तीन दिवस कांदा मार्केट बंद राहिल. सोमवारपासून (दि. १६) नेप्ती उपबाजार कांदा मार्केटमध्ये कांदा लिलाव चालू राहतील. याची सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांनी नोंद … Read more