अंतिम वर्षाच्या परीक्षा घर बसल्या देता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more

हिवरे बाजराची स्वतंत्र कोरोना नियमवाली

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा प्रशासनाने नुकतीच लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र असे असले तरी नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजाराने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली केली आहे व त्यानुसार सकाळी ५ तास व दुपारी २ तास किराणा दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या गावपातळीवरील उपाययोजनांतर्गत हिवरे बाजार गावाने आपल्या गावातील नागरिकांचे … Read more

कुस्तीची तयारीसाठी तिने पत्र्याच्या शेडमध्येच उभारली तालीम

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  परिस्थितीचे कारणे न देता जिद्द मनात बाळगून प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते. याचा प्रयत्य कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील सोनाली कोंडींबा मंडलिक या कुस्तीपटुला आला आहे. कुस्ती क्षेत्रात मोठे नाव मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सोनाली म्हणाली, मला श्रींगोंदा येथे प्रशिक्षणासाठी जायचे आहे. मात्र, कोरोनामुळे … Read more

पबजीसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी !

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  भारत- चीन मध्ये तणावग्रस्त परिस्थिती असतानाच मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.  पबजीसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास 100 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान … Read more

तक्षिला स्कूलचा वर्चुअल रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- तक्षीला स्कूलच्या वतीने वर्चुअल पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध 23 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेद्वारे देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, शहीद जवान व कोरोनायोध्दांना सलाम करण्यात आले.  दरवर्षी तक्षिला स्कूलच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये रंग दे … Read more

स्व. रामराव आदिक यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या ठिकाणी पहिली एमआयडीसी आणून आपली आत्मियता दाखवून दिली. त्यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. त्यांनी तालुक्यासाठी भरीव योगदान दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन … Read more

गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा … Read more

पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी  आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून  टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.  कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी … Read more

चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत वाढले २२९ रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. या नाराज झालेल्या 11 आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विकास निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून भाजपा खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तसेच मंत्रीपद घेतलेल्या मंत्र्यावर टीकेची तोफ डागली … Read more

अहमदनगर शहरात ‘ह्या’ सतरा ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाने १७ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. उत्सवाची सांगता १ सप्टेंबरला आहे. मिरवणुका काढल्यास गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, तसेच कलम १४४चे उल्लंघन होण्याचीही शक्यता असल्याकडे मनपाने गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे. शहरातील १७ प्रभागांत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

अभिमानास्पद कार्य : हिंदू मुलींच्या विवाहात त्यांच्या मागे उभा राहिला मुस्लिम मामा !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- हिंदू आणि मुस्लिम या धर्मियांमधील ‘बंधुत्वा’चे नाते सांगणाऱ्या सकारात्मक घटनाही देशात घडत आहेत. बोधेगाव येथील बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबांतील दोन मुलींचे कन्यादान घरासमोर राहणाऱ्या आणि लहानपणापासून मामाची भूमिका बजावणाऱ्या बाबाभाई या मुस्लिम युवकाने केले.  विशेष म्हणजे या मुस्लिम मामाने दोन्ही नववधू बहिणींचे कन्यादानही केले. ‘माणुसकीचा धर्म अन् धर्मापलिकडचं … Read more

पशुपालन व्यवसायासाठी ‘ही’ बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास राहिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राने सावरले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, … Read more

कांदा व्यापार्‍याचा शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा; भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  राज्यात कांदा उत्पादनासाठी राहुरी तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील वांबोरी येथील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्‍याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते. यामुळे आपले कांद्याचे पैसे बुडतात कि काय या कारणाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांदा उत्पादनासाठी वांबोरी (ता. … Read more