कोरोनाचे राज्यात एकूण ४६६६ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ … Read more

महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी गरजूंसाठी सरसावले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 :- सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत लोकसंपर्काच्या माध्यमातून वाटचाल केलेले नेतृत्व ही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची ओळख आहे. तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेच्या सोबत प्रसंगात माजी मंत्री कर्डिले यांनी नेहमीच आघाडीवर राहून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावले. जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लॉकडाऊनच्या काळातही सामान्य … Read more

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले काळजी करू नका…

श्रीगोंदे :- काही ठिकाणी गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, काळजी करू नका. सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. घोडचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, उपअभियंता दिलीप साठे, देशमुख यांच्यासमवेत पाचपुते यांनी रविवारी चारी ९ ते १४ ची पाहणी केली. ते म्हणाले, १३२ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : निधनानंतर चार दिवसांनी ‘त्या’ व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट …

अहमदनगर – निधनानंतर चार दिवसांनी जामखेड तालुक्यातील व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.हा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यावर घरातील चार व्यक्ती व संबंधित व्यक्तीला तपासणाऱ्या खासगी हाॅस्पिटलच्या डॉक्टरांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले. दरम्यान, परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या चारही जणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रविवारी दुपारी नगर येथून सोडण्यात आले आहे. त्यांना आता जामखेड … Read more

अखेर ‘त्या’ अहमदनगरकरांनी कोरोनाला हरवलं !

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत. आज संगमनेर तालुक्यातील ०४ तर जामखेड येथील ०४ रूग्ण त्यांचा १४ दिवसानंतरचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त … Read more

अभिमानास्पद : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब तयार…ठरले देशातील पहिले रुग्णालय !

अहमदनगर :- फक्त सहा दिवसांत ‘कोविड १९‘ साठी नवीन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता वैद्यकीय अभिमत विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर चाचण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र विखे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. सध्या कोरोना चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ अधिक लागतो. … Read more

कोरोना विरोधात लढण्यासाठी राजमहल सोडून रुग्णालयात काम करतेय ही सुंदर राजकुमारी !

अहमदनगर Live24 :- कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी स्वीडनच्या राजकुमारी सोफिया या देखील पुढे आल्या असून, कोरोनाशी लढण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. स्वीडनची राजकुमारी सोफिया कोरोनाव्हायरस संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहे. 35 वर्षीय सोफियाने तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन शिकली आहे. यासह, ती आता स्टॉकहोल्ममधील रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे सोफिया या … Read more

‘हि’लक्षणे तुमच्यात दिसताच समजून घ्या तुम्हाला कोरोना चा धोका !

कोरोना हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग श्वसन आजार आहे (फ्लू सारखा) ज्याची लक्षणे खोकला, ताप, व अधिक गंभीर आजारात श्वास घेण्यास त्रास अशी आहेत. हात वारंवार धुवून, चेहर्‍याला स्पर्श करणे टाळून आणि आजारी लोकांचा जवळचा संपर्क टाळून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांत जगात वेगाने वाढ होत आहे, वैज्ञानिकांनी … Read more

आणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली…

अहमदनगर / अकोले :- मागील सुमारे पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या महिलेचे एका अपघातात निधन झाल्याची माहिती तिचे कुटुंबियांना मिळाली. ती ग्राह्य धरून नातलगांनी तिचे श्राद्ध कर्मही केले आणि अचानक ती महिला जिवंत अवस्थेत परतली. सटाणा, इगतपुरी, अकोले येथील पत्रकारांनी पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या या वृद्धेला तिच्या कुटुंबात परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच या लॉकडाऊनच्या … Read more

लॉकडाउन च्या काळात मूड अप करणारी मुखवटे, अहमदनगर आणि फक्त मराठी वाहिनीची ” रसिका मित्रहो ” मैफल

                 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अनेकांना अनेक अडचणी आल्या, सुरुवातीच्या आठवड्यात अनेकांना समजलंच नाही आपल्याबरोबर नेमकं काय होतंय? घरात बसण्याची सुटलेली सवय आणि अशा काही काळात आपल्याला बाहेर जाता येत नाहीये यामुळे गेलेला मूड…                 … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत !

अहमदनगर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला मंजरी दिली नाही तर उद्धव ठाकरे आमदार होऊ शकणार नाहीत – त्यामुळे उद्धव ठाकरे यांना २८ मे नंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू, शेती निगडित उद्योग आणि औद्योगिक प्रकल्प सुरू होणार, केंद्र आणि राज्य शासनाने दिलीय सवलत

अहमदनगर :- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्या उद्योग आणि औद्योगिक प्रकल्पांना ते सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, अशा औद्योगिक प्रकल्‍प / उद्योगांना उत्‍पादन चालु करण्यासाठी किंवा उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी कोणत्याही लेखी वा इलेक्ट्रॉनिक पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात विविध जीवनावश्यक वस्तु शेतीशी निगडित उत्पादनांचा समावेश … Read more

आता बातम्याच द्यायच्या नाहीत का? बातमी दिली म्हणून अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारावर हल्ला

अहमदनगर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातम्या देणेही आता पत्रकारांना अडचणीचे ठरू लागले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकार गावात, शहरात फिरून बातम्या देत आहेत. नागरिकांकडून कौतूक दूरच त्यांच्या रोषालाच सामोरे जावे लागत आहे. नगर जिल्ह्यात पानेगाव (ता.नेवासे) येथील १७ कुटुंबांना क्वारंटाइन केल्याची बातमी गावातील पत्रकार बाळासाहेब नवगिरी यांनी दिली होती. बातमी दिल्याच्या रागातून जमावबंदीचा आदेश मोडत गावातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चाा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी आता प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर संबंधीत प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा … Read more

सुखद बातमी : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात होतेय वाढ…

मुंबई :- राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 2916  जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर 5 टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.  असे … Read more

राज्‍यातील शेतक-यांच्‍या प्रश्‍नांसदर्भात माजी मंत्री आ.विखे पाटील यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 :-  कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडुन शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे, फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी जिल्‍ह्यांच्‍या सिमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘हा’आहे हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्याचा उद्देश वाचा काय म्हणाले पालकमंत्री …

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात हॉटस्पॉट केंद्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाहीर केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठीची ती उपाययोजना आहे. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.  हॉटस्पॉट जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना सर्व जीवनावश्यक सेवा … Read more