स्वस्त धान्याचा खर्च करणार खासदार डाॅ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- जिल्हा प्रशासनाने शहरातील मुकुंदनगर भाग सील केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगरमधील सुमारे अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण करावे. या धान्याचा खर्च मी स्वतः देईन, असे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी बुधवारी सांगितले. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन करत असलेल्या … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित व्यवसायांना सूट

मुंबई :- राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्ट्याचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे. कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘अँक्शन प्लॅन’

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहे. आजाराची लक्षणे दिसतील … Read more

दहा रुपयांची तंबाखू पुडी झाली पंचवीस रुपयांना !

अहमदनगर Live24 :- कर्करोगाचा धोका असला, तरी तंबाखूला मोठी मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे टपऱ्या बंद आहेत. तंबाखूचे दर ठोक बाजारात वाढवण्यात आल्याचे कारण पुढे करत सध्या चढ्या दराने पुडीची किरकोळ विक्री सुरू आहे. तंबाखू सर्व पानटपऱ्या, तसेच किरकोळ किराणा दुकानात सहज मिळते. मात्र, कोरोना लाॅकडाऊनमुळे केवळ जीवनावश्यक साहित्य, तसेच आरोग्य सेवा मिळवण्याचीच मुभा आहे. मागील पंधरा … Read more

प्रा. राम शिंदे झाले मतदारसंघात सक्रीय !

कर्जत – विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत. मात्र, करोनामुळे अडचणीत असलेल्या काळात त्यांनी सक्रिय होत जनतेला आधार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेतून बरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले अशी लोकभावना उमटत … Read more

लॉकडाऊन नियमावली जाहीर : ‘या’ सर्व सेवा रहाणार बंद,मास्क घालणं अनिवार्य तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 :- देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. MHA issues updated consolidated revised guidelines after correcting the date from 20th May to 20th April 2020, on the … Read more

प्रसार माध्यमातील सक्रीय पत्रकारांची कोव्हीड-19 चाचणी करावी

मुंबई :- मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली, त्यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांचेशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले. वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी … Read more

गुंड मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला !

अकोले – गुंड प्रवृत्तीच्या मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे व इतरांनी केली. रात्री 12 वाजता पोलीस ठाण्यात चल असे सांगून पोलीस गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात व बंगल्यावर जणांच्या गटाने पोलिसांसमोर मारहाण करतात. हा धक्कादायक प्रकार मंत्री करीत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली … Read more

उंबरठ्याच्या बाहेर गेलात तर कोरोनाची लागण झाली असे गृहीत धरा….

कोपरगाव :- शहरात कोरोनाचा रूग्ण सापडल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून कोरोना कुठल्याही क्षणी आता ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात प्रवेश करु शकतो. याची जाणीव ठेवून नागरिकांनी गाफीलपणा सोडून सतर्क होवून घरात बसनेच हिताचे राहील. कोपरगाव तालुक्यात करोनाची बाधा नव्हती पण आता कोपरगाव शहरात करोनाचा रुग्ण सापडला आहे. खेडेगावात करोना येणार नाही … Read more

लाखो बेरोजगार, लहान व्यावसायिक उद्ध्वस्त, कोरोना व्हायरसमुळे आले हे संकट …

अहमदनगर :- भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये ४० वर्षांतील सर्वात कमी आर्थिक विकास दर नाेंदवला जाऊ शकतो. हा दर २.८ टक्क्यांच्या खाली राहू शकतो. कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान जागतिक बँकेने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हे मूल्यांकन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे पूर्ण आशियात पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. एकट्या भारतात लॉकडाऊनमुळे … Read more

तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही : खा. लोखंडे

अकोले : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनतेला सर्वसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. तालुक्यातील सर्व अतिशय चांगले काम आहे. त्यामुळे एकही रुग्ण तालुक्यात नाही. आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटाझर आपण देणार आहोत, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले. अकोले तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार … Read more

सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर होईल ‘ही’ शिक्षा वाचा अत्यंत महत्वाची बातमी ….

अहमदनगर :-  करोनाचं संकट असताना पोलिसांसमोर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांनाही रोखण्याचं आव्हान आहे. करोनासंबंधी येणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर सर्रासपणे शेअर, फॉरवर्ड होत असताता. तुम्हीदेखील असे मेसेज शेअर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे कारण सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकल्यास जेलमध्ये जावं लागू शकतं. पोलिसांनी यासंबंधी पत्रक जारी केलं आहे. काय केल्याने होऊ शकते … Read more

दारू ऑनलाइन मिळणार ? जाणून घ्या सत्य

अहमदनगर :- लॉकडाऊनच्या काळात  वाईन शॉप्स, बार, परमिट रूम बंद आहेत. त्यामुळे रोज दारू पिणार्यांचे हाल होत आहेत , दारू मिळविण्यासाठी पाताळात जाण्याचीदेखील अनेकांची तयारी आहे. अशा तळीरामांची ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑनलाइन वाईन, ऑनलाइन लिकर, अशा नावाखाली घरपोच दारू पोचविण्याचे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात फ्रॉड सुरू आहे. अशा प्रकारे कोणालाही ऑनलाइन दारूविक्रीची … Read more

10 रुपयांच्या तंबाखू पुडीची होतेय 30 रुपयांना विक्री…

अहमदनगर –  लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयांनातर बिडी, सिगारेट व बंदी असलेल्या गुटख्याचीही शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे बंदीतही हा … Read more

करोना बाधीत रुग्ण कोपरगावात आढळल्याने सर्वत्र स्मशान शांतता …

कोपरगाव :- तालुक्यात पहीला करोना बाधीत रुग्ण आढळल्याने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आरोग्य विभाग, पोलीस ,नगरपालिका अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी तातडीची बैठक घेवून खबरदारी म्हणुन योग्य त्या उपाय योजना सुचविल्या. करोना विषाणुची लागन इतरांना होवू नये म्हणुन १४ एप्रिल पर्यंत संपुर्ण शहरा शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाधीत महीलेच्या परिसरातील आत्यावश्यक सेवा बंद करण्यात … Read more

शेतकर्यांना डोळ्यात पाणी आणण्याची वेळ …

अहमदनगर :- कांद्याचे भाव गेल्या चार दिवसात 2200 रुपयावरून 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल घसरल्यामुळे शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यात लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर १५०० … Read more

Live Updates : लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम – उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे.  CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/vkTgkJqohP — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020 Live Updates –  महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन … Read more

आता पोलिसांची ड्रोनद्वारे नजर…अनावश्यक बाहेर पडू नका अन्यथा गुन्हे दाखल होतील !

जामखेड :- शहरातील सर्व प्रमुख मार्गावर राज्य राखीव पोलीस दल व जामखेड पोलीस यांनी एकत्रित संचलन करून शासनाच्या सुचनेचे पालन करण्याची माहिती दिली. तसेच अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिला. जामखेड शहरात मागील आठ दिवसात आढळलेले सहा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तसेच धार्मिक भावना दुखावल्यामुळे दाखल … Read more