राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील या तरुणाची वर्णी लागणार ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तसेच पारनेर नगर मतदार संघाचे नाव आपल्या वकृत्व गुणातून व सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचविणारे शिवव्याख्याते जितेश सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मा.आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील हे या महत्वाच्या पदाची धुरा संभाळत होते. परंतु त्यांनी … Read more

धक्कादायक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय…  

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, ती २६ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली.  कोरोनाच्या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत म्हणजेच शहरी क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळा-कॉलेजेसना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय मॉल्सदेखील बंद ठेवण्याचे … Read more

शाळा, कॉलेजसह आठवडे बाजार बंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीगोंदा : – कोरोनाच्या कोविड-१ या घातक विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय उद्या दि. १६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून याबाबत पालक-विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून सोशल मिडियामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्याचा होणारा आठवडा बाजार रद्द करण्यासंदर्भात … Read more

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 22 रुग्ण आढळले आहेत.  राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी … Read more

संगमनेरमध्ये कोरोनाचा रुग्ण असल्याची अफवा

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :– जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. देशातल्या इतर राज्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी संगमनेर बसस्थानकावर कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याची बातमी सोशल मीडियात पसरली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ती निव्वळ अफवा होती त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन … Read more

अहमदनगर – पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर – पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.  संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांसंबधी लोकसभेत चर्चा सुरू आहे. त्या वेळी डॉ. विखे बोलत होते.नगर-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की, ‘हे अंतर जरी कमी वाटत असले, तरी वाहतुकीची कोंडी आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. त्यामुळं आता राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा … Read more

अंगाचा थरकाप उडवणारी घटना : ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व त्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आला तर ? होय अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पंजाबमध्ये घडलेली आहे. एका व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मृत व्यक्ती चक्क घरी परतली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्याचा मृत्यू … Read more

कोरोनामुळे 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे, मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी नगरकर एकवटले आहेत. प्रशासन, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक आपापल्या परीने खबरदारी घेत असून जनजागृतीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोठ्या यात्रा, उत्सव या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या … Read more

‘या’ कारणामुळे काढली जाते गावात जावयाची गाढवावरून धिंड !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची जगावेगळी प्रथा सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून पाळली जात आहे. धुलीवंदन ते रंगपंचमी दरम्यानच्या कालावधीत जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याची निश्चित माहिती नाही असे काही गावकरी सांगतात. रंगपंचमीला सर्वच ठिकाणी रंगोत्सवाला उधान आलेले असतांना वडांगळीकर मात्र … Read more

‘एवढी’ आहे शरद पवारांची संपत्ती, सहा वर्षांत झाली इतकी ‘वाढ’ आणि ‘इतक्या’ रुपयांचे कर्ज …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी महाराष्ट्रातून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे.यावरून पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली. शरद पवार  यांची संपत्ती गेल्या सहा वर्षांत ६० लाखांनी वाढल्याचं दिसतं, त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची … Read more

लवकरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप : महाविकाआघाडीचं सरकार जाणार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई :- मध्य प्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करुन मोठा निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मध्य प्रदेशात सत्तांतर निश्चित होणार असून काँग्रेस सरकार जाऊन भाजपचे सरकार तेथे स्थापन … Read more

आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले आमदार नीलेश लंके यांचे कौतुक म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लोकनेते आमदार नीलेश लंके हे ज़नतेचे खरे सेवक असून, २४ तास ते ज़नतेसाठी उपलब्ध असतात, असे प्रतिापदन मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. लोकनेते आमदार नीलेश लंके यांचा दि.१० मार्च रोजी वाढदिवस हंगा येथे उत्साहात साजरा झाला. या वेळी आ. शेळके बोलत होते. आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील विघ्नहर्ता … Read more

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीला जोर

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- मुख्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध असल्याने नवीन जिल्हा निर्मितीसाठी फारसा खर्च न येता श्रीरामपूर जिल्हा होऊ शकेल. चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढून जिल्हा विभाजन करून निकषांच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घालण्यात आले. श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली थोरात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. घाबरून जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना केले आहे. दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर शहरातील चौघेजण दुबई … Read more

हास्यास्पद : राजेंद्र नागवडे यांनी कोरोना व्हायरसवर शोधला ‘तपकीर ओढण्याचा’ जालीम उपाय !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान या जीवघेण्या अश्या कोरोना या विषाणूवर तपकीर ओढणे हाच जालीम उपाय असल्याचा शोध श्रीगोंद्यातील भाजपनेते राजेंद्र नागवडे यांनी लावला आहे. याबाबत त्यांनी स्वतःची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असून त्यात त्यांनी तपकिरीचा दावा केला … Read more

लोकनेते : आमदार निलेश लंके

पारनेर – नगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लोकनेते निलेश लंके यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धा उमेदवाराचा तब्बल ६२ हजार मतांनी पराभव केला. एका प्राथमिक शिक्षकाच्या सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांनी सर्वच आमदार पुत्रांची एक फळीच गारद केली आहे. प्रस्तापित पुढाऱ्यांना डावलून पारनेर – नगर तालुक्यातील जनता देखील लंके यांच्या पाठीशी ठाम … Read more