अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- हिवाळ्यासारखी थंडी पडल्यानंतर पुढील काही दिवस महाराष्ट्रात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

यामुळे नगर जिल्ह्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा,

सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वार्‍यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.