चंद्रकांत पाटलांचं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार मोठं ट्विट!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- maharastra braking news आघाडी सरकारमधील धुसफूस अजून संपलेली नाही. त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्याकडे जाण्यास तयार नाही(Chandrakant patil).

अजित पवारांच आणि अमित शहाचं काय बोलनं झालं, पवार आणि मोदी साहेबांच काय बोलणं झालं आणि देवेंद्रजीचं आणि अमित शहाचं काय बोलणं झालं ते मला काही माहित नाही आणि मी तितका मोठा नाही असे सांगून त्यांनी सरकारमध्ये अंतर्गत मोठा संघर्ष चालू आहे असेच सांगितले. त्यांच्याकडून मिळाले वागणूक पाहता आमची तयारी नाही. पण केंद्रीय निर्णय जो होईल तो आम्हाला मान्य असेल अशी गुगली चंद्रकांत पाटलांनी टाकली.

सरकारमध्ये अंतर्गत मोठा संघर्ष चालू आहे त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर होत आहे. अधिवेशनात जे काही काम झाले ते सरकारच्या फाद्याचेच झाले . ते जनतेच्या फायद्याचे नाही अशी टीका सुद्धा त्यांनी सरकारवर केली.

आघाडी सरकारचा २६ महिन्यांच्या कामकाजाबत
सरकारचा २६ महिन्यांचा इतिहास हा भाजप कार्यकर्त्यांना त्रास देणे आणि त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवणे, सामान्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असाच आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्याकडे जाण्यास तयार नाही.

राज्यातील समस्यांबाबत काय ट्विट केले.
पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला.
वीजबिल, वीजकनेक्शन, obc राजकीय आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न यांपैकी कोणताही प्रश्न सुटलेला नाही असे त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!