file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील एका ठिकाणी बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू होत. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यामध्ये बायोडिझेल सह विविध वाहने असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे… राहुल रमेश रासकर (वय 27) रा. पावबाकी रोड, मोहम्मद यासीन वाहिद हुसेन रा. उत्तराखंड, सुनील मारुती पावसे, संदीप मारुती पावसे, अण्णासाहेब जाधव रा. हिवरगाव पावसा व गणेश गणेश दादासाहेब सोनवणे रा. वेल्हाळे, संजय पगडाल रा.संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील तिरंगा चौका लगत बेकायदेशीररित्या बायोडिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना समजली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकून झडती घेतली.

यावेळी एका वाहनातून दुसर्‍या वाहनात बायोडिझेल बेकायदेशीररीत्या भरले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणाहून तीन लाख दहा हजार रुपये किमतीची पिकप जीप (क्रमांक एम. एच. 40 डि.एस 7440), एक लाख 72 हजार रुपये किमतीच्या दोन टाक्या व फिल्टर मशीन,

सहा लाख 25 हजार रुपये किमतीची आयशर वाहन (क्रमांक एम. एच. 17 बी वाय 5245) असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.