अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- चीनी कार निर्माता वुलिंग होंगगुआंगने एक नवीन मिनी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक कार नॅनो इव्ही च्या नावाने सादर केली आहे.(Cheaper Electric Car then Royal Enfield)

अहवालांनुसार, ही केवळ सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असणार नाही तर जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देखील असू शकते. या व्यतिरिक्त, कार न्युज चायना च्या अहवालात सांगण्यात आले आहे की, नॅनो इव्ही ची किंमत २० हजार युआन (सुमारे २.३० लाख रुपये) पेक्षा जास्त असणार नाही.

याचा अर्थ असा की नॅनो ईव्हीची किंमत भारतातील मारुती अल्टोपेक्षाही कमी असू शकते. याशिवाय, नॅनो इव्ही बद्दल असे म्हटले जात आहे की ते चीनमधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार उलिंग हॉन्गगुआंग मिनी इव्ही पेक्षा स्वस्त असेल. मात्र, कंपनीने अद्याप त्याची किंमत जाहीर केलेली नाही.

Cheaper Electric Car then Royal Enfield

नॅनो इव्ही

कंपनीने या वर्षी २०२१ टियांजिन इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये ही कार प्रदर्शित केली. शहरी वापरानुसार बनवलेल्या या कारमध्ये फक्त दोन सीट आहेत. या व्यतिरिक्त, कारची टर्निंग रेडियस ४ मीटरपेक्षा कमी आहे.

तसेच, जर आपण या कारच्या परिमाणांबद्दल बोललो तर नॅनो इव्ही ची लांबी २,४९७mm, रुंदी १,५२६ mm आणि उंची १,६१६ mm आहे. यानुसार त्याचा आकार टाटा नॅनोपेक्षा लहान आहे.

नॅनो ईव्हीची फीचर्स

जर आपण कारच्या फीचर्सबद्दल बोललो तर तिची टॉप स्पीड १०० kmph आहे. त्याचबरोबर कंपनीने या कारमध्ये IP67- सर्टिफाईड 28 kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे.

ही छोटी इलेक्ट्रिक कार एकदा चार्जवर ३०५ किमीची रेंज देईल. कंपनीच्या मते, नियमित २२०-व्होल्ट सॉकेटद्वारे पूर्ण चार्ज होण्यासाठी १३.५ तास लागतील.

त्याच वेळी, ६.६ किलोवॅट एसी चार्जरद्वारे ती केवळ ४.५ तासांमध्ये चार्ज केले जाऊ शकते. नॅनो इव्ही ला रिव्हर्सिंग कॅमेरा,

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, AC, कीलेस एंट्री सिस्टीम, LED हेडलाइट्स आणि ७-इंच डिजिटल स्क्रीन मिळते. या कारची किंमत लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.