अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी नुकताच केंद्राच्या मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

भुजबळ (Bhujbal) यांनी सांगोल्यातील (Sangola) मौजे महूद या ठिकाणी शेतकरी परिषदेत (Farmers Council) बोलताना मोदी सरकार वर चांगलेच टिकास्त्र सोडलेत.

भुजबळ यांनी सांगितले की, केंद्र सरकारचा (Central Government) कारभार केवळ एका व्यक्तीवर अवलंबून आहे. केंद्रातील सर्व निर्णय नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावानेच होतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात देखील मोदी सरकारचा मोठा हात असल्याचा दावा भुजबळ यांनी केला. पुढे बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, “देशाचे कृषिमंत्री कोण आहेत हे मला अजूनही माहित नाही.

यामुळे केंद्रीय कृषिमंत्री (Union Minister of Agriculture) शेतकरी हिताचा निर्णय घेऊच शकत नाही. यामुळेच देशातील शेतकरी देशोधडीला लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे”.

असा घणाघात शेतकरी परिषदेत बोलताना भुजबळ यांनी केला. शेतकरी परिषद सांगोल्यात भुजबळ यांनी सांगोल्यातील डाळिंबावर मर रोग आणि पिन होल बोरर किडीच्या नुकसानीकडे देखील लक्ष वेधले.

भुजबळ यांनी सांगितले की, डाळिंबावर आलेल्या मर रोगावर तसेच पिन होल बोरर या किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या नुकसानीवर काहीतरी मार्ग काढला जावा यासाठी ताबडतोब मंत्रिमंडळाची व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल व ठोस उपाययोजना केली जाईल.

या कामासाठी माननीय शरद पवार जी यांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंब पुनर्लागवडीसाठी मदत केली जाईल असे आश्वासन देखील भुजबळ यांनी यावेळी दिले.

सोलापूर जिल्ह्यात एकूण एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा आहेत. यापैकी सुमारे 70 टक्के डाळिंब बागा पिन होल बोरर आणि मर रोगाच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत.

यामुळे निश्चितपणे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी तात्काळ मंत्रिमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल आणि डाळिंबाच्या झालेल्या नुकसानीबाबत योग्य तो निर्णय लवकरच आपल्यासमोर असेल, असे मत यावेळी भुजबळ यांनी मांडले.

भुजबळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, महाविकास आघाडी सरकार राज्यातील सर्वसामान्य नागरिकसाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी अतिशय चांगले काम करू पाहत आहे मात्र जनकल्याणासाठी काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला काम करू द्यायचं नाही असा पवित्रा भाजपने अंगीकारला आहे. असा घनाघात नाव न घेता भुजबळ यांनी भाजपवर केला आहे.