Maharashtra News:मागील वर्षी गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आल्याने पंतप्रधान मोदी टीकेचे लक्ष्य ठरले होते.

तसाच प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत पुण्यात घडला. महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घघान स्वत: शिंदे यांच्याच हस्ते आज होणार होते.

मात्र, टीका सुरू झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.हडपसर येथील शिवसेनेचे शिंदे गटातील माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी यांनी हा प्रताप केला. उद्यानांना कुटुंबातील व्यक्तींची किंवा वैयक्तिक नावे देता येणार नाहीत,

असा ठराव महापालिकेकडून करण्यात आलेला असल्याने याला विरोध सुरू झाला. भानगिरे यांच्यावर पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आपल्या नेत्याला खुष करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम ठरविला खर पण नंतर त्यांच्याच अंगाशी आला.