CM Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.

यामध्ये ते चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यायलायतून देण्यात आली आहे.आतापर्यंत कोरोना आणि इतर विषयांच्यावेळी ठाकरे यांनी अशा पद्धतीने जनतेशी संवाद साधला आहे.

आज राज्यात उदभवलेल्या विचित्र राजकीय परिस्थितीवर ते बोलणार आहेत. त्यामुळे ते नेमके काय बोलणार? त्यांची बाजू कशी मांडणार? पुढील काही घोषणा करणार का? याबद्दल उत्सुकता आहे.

CM Uddhav Thackeray Live

जे गेले त्यांनी माझ्या या समोर बसा मी राजीनामा देतो,आज संध्याकाळी माझा मुक्काम हलवतो ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की , कोणताही अनुभव नसताना मी प्रशासकीय व्यवस्था सांभाळत होतो त्यानंतर कोरोना आला सर्वांच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळण्यात आला.

मी कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे मात्र मी आजारी होतो त्याबद्दल मी आता काही बोलू शकत नाही मी ऑनलाईन सर्वांशी भेटत होतो

हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे हिंदुत्वाबद्दल विधीमंडळात बोलणारा मी पहिला नेता असेल मात्र काही जण असे भासवण्याचा प्रयत्न करतात की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारा पासून दूर चालली आहे.2014च्या बिकट परिस्थिती नंतरही 64 आमदार याच शिवसेनेने निवडून आणले होते.

शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांचे आता फोन येत आहेत जबरदस्तीने नेल्याचा दावा गेलेल्या आमदारांनी केला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री पद स्वीकारले जर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मला मुख्यमंत्री पद नको असं बोलले असते तर मला काही वाटलं नसतं मात्र माझ्या लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं. सुरतला जाऊन हे बोलायची गरज नव्हती त्यांनी माझ्या समोर येऊन बोलले असते तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.

मी राजीनामा पत्र तयार करून ठेवतो पवारांनी माझ्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना द्यावे मी शिवसेनापक्षप्रमुख पद ही सोडायला तयार आहे मात्र माझ्या समोर येऊन माझ्या शिवसैनिकांनी हे सांगायला पाहिजे.

शिवसेना कदापी हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही, हिंदुत्व आमचा श्वास आहे, शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांमध्ये गुंफलेली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

२०१२ साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर २०१४ साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आलेत. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

माझी जी शस्त्रक्रीया झाली होती त्यानंतरचे दोन, तीन महिने फार विचित्र होते. तो काळ फार विचित्र होते. त्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. मी भेटत नव्हतो तर काम होतं नव्हती असं नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग अशीच ऑनलाइन केली होती.