Maharashtra News:सत्तानाट्य आणि सत्तांतरानंतर अविश्रांतपणे धावपळ केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन महाबळेश्वर येथे सहकुटुंब विश्रांतीसाठी गेले आहेत.

मात्र, त्यांचे तेथील वास्तव्य आता वादात अडकले आहे. तेथे बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेलमध्ये शिंदे यांनी मुक्काम केल्याची तक्रार शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे.

मोहितेंनी सांगितले की, मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर आलेले आहेत. बेकायदेशीर बांधकामे असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे.

या हॉटेलच्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार तक्रारी झाल्या आहेत. विविध पुरावे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

यावरून अतिक्रमणे काढण्याचे आदेश झालेले आहेत. महाबळेश्वरात दुसरी अनेक हॉटेल्स असताना मुख्यमंत्री याचा हॉटेलमध्ये मुक्कामी का राहिलेत.

त्यांच्या या मुक्कामातून हॉटेलच्या बेकायदेशीर बांधकामाना अभय देण्याचा प्रयत्न होत नाही ना, असा आरोपही मोहिते यांनी केला आहे.