अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात अपघटनाच्या सत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. नियमांचे उल्लंघन, बेशिस्त वाहन चालविणे, यामुळे अनेकदा अपघात घडले आहे, यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.(Ahmednagar Accident news)

यातच संगमनेर मध्ये झालेल्या एका अपघातात एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बालक जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात घडली.

यामुळे परिसरात मोठी हालहाल व्यक्त करण्यात होत होती. दरम्यान संगमनेर शहर व परिसरात वाळूची बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

याकडे महसूल व पोलीस खात्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोड परिसरातून नंबर नसलेला एक ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत होता.

गर्दीच्या रस्त्यातून तो भरधाव जात असताना या ट्रॅक्टरने एका बालकाला धडक दिली. या अपघातात एका बालकाचा जागीच मृत्यू झाला व एकजण जखमी हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

दरम्यान अपघातानंतर वाहन चालक मात्र पसार झाला घटनेची माहिती समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून बालकाचा मृतदेह हलवला. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झाला नव्हता.