अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाल्याने ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकल्याने राज्यात आगामी काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान यातच नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच आज राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.

महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
काल श्रीरामपूर आणि कोपरगावात पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी,
हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे 2 ते 3 दिवस राज्यात विदर्भ,
मराठवाडा,मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची तीव्रता जास्त असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम