अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील झारेकर गल्लीतील 18 शौचालये अज्ञात व्यक्तींनी पाडली. आता या जागेवर आता स्वच्छतागृहांऐवजी उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कारण या स्वच्छतागृहांमुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. झारेकर गल्लीतील 24 पैकी 18 स्वच्छतागृहे काही व्यक्तींनी शनिवारी रात्री जमीनदोस्त केली.

हे काम कोणी व का केले? माहित नाही. परंतु परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने ते हिताचे झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले.

तर रस्त्यावरून येणारे जाणारे व्यक्ती याचा वापर करत होते. मात्र या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने परिणामी घाण होऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.