Royal Gala apples in a pile. All of the apples are red with a slight yellow hue to them. Several apples sit at an angle or on their side, while others sit perfectly straight. There almost forty apples in view.

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   माल वाहतूक करत असताना अनेकदा दुर्दैवाने अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडते त्या परिसरातील ही एक संधी असते.(Apple Truck accident)

अशीच राहुरीत सफरचंद घेऊन जाणार ट्रक पल्टी झाल्याने या ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. नगर- मनमाड राज्य महामार्गावर काल सफरचंद घेऊन जाणारा ट्रक राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे उलटला.

त्यामुळे दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक तरूणांनी अपघातस्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत कार्य केले. तर काही जणांनी सफरचंदावर डल्ला मारला.

काहींनी चक्क सफरचंदाचे खोके लंपास केले.मालवाहतूक ट्रक हा सफरचंद भरून काश्मीर येथून निघाला होता. तो राहुरीकडून नगरमार्गे आंध्रप्रदेश येथे जात होता.

सकाळी सात वाजेच्या सुमारास तो राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेसमोर रस्त्याच्या मधोमध उलटला.

तेव्हा ट्रकमधील सफरचंद रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. यावेळी अनेकांनी सफरचंदावर मनसोक्त ताव मारला. काही भामट्यांनी चक्क सफरचंदाची पेटारेच उचलून नेली. तर काहिंनी पिशव्या भरून नेल्या.