अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- कोरोना विषाणू बाधितांचे प्रमाण घटत असून आता सर्वांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.आजार होण्यापूर्वीच योग्य वेळी निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते.

हाडामधील कँल्शीयम तपासणी हि सध्याची गरज आहे.त्यासाठी नगरकरांनी या शिबिराचा लाभ घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी,

मनपातर्फे परिसराचे सुशोभिकरण व विकासाची काळजी आम्ही घेऊ असे मत महापौर सौ रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केले जय मातादी सार्वजनिक वाचनालय व बालाजी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने

व सिटीकेअर हॉस्पिटल सहकार्याने आदर्शनगर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत हाडांमधील कँल्शीयम तपासणी शिबिराचे उद्घाटन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मनपा सभागृह नेते श्री.अशोक बडे,महिला बालकल्याण सभापती सौ.पुष्पा बोरुडे,माजी महापौर सौ.शीला शिंदे,मा.अनिल शिंदे ,मा.खासेराव शितोळे,नगरसेवक श्री.शामभाऊ नळकांडे,श्री.प्रशांत गायकवाड,

श्री.सचिन शिंदे,डॉ.संदीप सुराणा,श्री.संतोष दसासे ,श्री.पारुनाथ ढोकळे,सौ.संगीता दसासे ,सौ.सुरेखा ढोकळे, आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.सुराणा म्हणाले की,सध्याच्या काळात हाडांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. यावर उपया म्हणून घेतली जाणारी सर्व औषधे ही वेदनाशामक असून त्यांनी आजार बरा होत नाही.

तसेच काही सतत औषधे घेतल्याने त्याची सवय लागते. म्हणूनच योग्य वेळी हाडांची कँल्शीयम तपासणी केली तर पाठदुखी,कंबरदुखी टाळता येते.

यासाठी हे शिबीर आयोजित केले असून या तपासणी साठी कमीतकमी १००० रु.खर्च येतो मात्र या शिबिरात ही तपासणी मोफत करण्यात येणार असून त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की, या परिसरात होणारे रस्ते डांबरी न करता सिमेंटचे करावेत.तसेच ड्रेनेज व इतर कामे लवकरात लवकर व्हावीत .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संतोष दसासे यांनी केले.कार्यक्रमास श्री.शंकर राखुंडे ,श्री . प्रमोद घोडके,श्री.शशिकांत तांबे,श्री.वसंत खोसे,श्री.सागर गांधी,श्री.भाऊसाहेब नरसाळे,श्री.थोटे व मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री.शिंदे यांनी केले तर आभार पारुनाथ ढोकळे यांनी मानले.