file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- शहरात सोमवारी (दि. 25) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास सहा चोरट्यांना जुन्या बसस्थानका समोरील अंबर प्लाझा इमारतीतील एचडीएफसी बँकेसमोर पकडण्यात कोतवाली व तोफखाना पोलिसांना यश आले आहे.

अजून काही चोरट्यांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख कचरे यांनी दिली.

चोरट्यांनी नावे : जिग्रेश घासी, अजय माचरेकर, राकेश बंगाली, दीपक इन्द्रेकर, मयूर बजरंगे, राजेश टमायेचे (सर्व रा. गुजरात) अशी पकडलेल्या लुटारूंची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपूर्वी शहरातील विशेषत: कोठी रोड, महात्मा फुले चौक,

मार्केटयार्डचा परिसर या भागात तसेच सावेडी उपनगरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी तसेच नागरिकांच्या पैशांच्या बॅगा पळवल्या गेल्या होत्या. तोफखाना आणि कोतवाली या दोन्ही पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथके या गुन्हेगारांच्या मागावर होते.

पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला होता. त्यानुसार पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. सोमवारी दुपारी सहकार सभागृहासमोरील एचडीएफसी बँकेच्या परिसरात काही संशयित आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला.

बँकेतून रोख रक्कम काढून एक व्यक्ती बाहेर जात असताना त्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने घेरले. त्यानंतर या टोळीतील सर्वजण पळू लागले. मात्र पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडले.