अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील धर्माधिकारी मळा येथील स्थानिक नागरिकांनी फाईव्ह जी मोबाईल टॉवरला विरोध दर्शविला आहे. दरम्यान याप्रकरणी महापालिकेत सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.

अंतिम सुनावणी होईपर्यंत मोबाईल टॉवरचे प्रेक्षपण बंद ठेवण्याचे मोबाईल कंपनीला स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि,

शहरातील धर्माधिकारी मळा येथे फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात.

नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांनादेखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याने या टॉवरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.

महापालिकेत झालेल्या सुनावणी प्रसंगी सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांना मोबाईल टॉवरला विरोध असलेल्या ९५ स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

त्यामुळे अंतिम सुनावणी होईपर्यंत मोबाईल टॉवरचे प्रेक्षपण बंद ठेवण्याचे मोबाईल कंपनीला स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे काही काळासाठी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.