New Delhi: Indian comedian Raju Srivastav performs during a programme organised by PHD Chamber at Siri Fort Auditorium in New Delhi, on March 16, 2016. (Photo: Sunil Majumdar/IANS)

Raju Srivastava :प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (वय ५८) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. गेल्या ४० दिवसांपासून ते दिल्लीतील एम्समध्ये इस्पितळात दाखल होते.

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मागील ४० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज इस्पितळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते.

१९८८ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. अनेक चित्रपट आणि शो त्यांनी केले. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही त्यांनी काम केले.