अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- आजही तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

देशात 3 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमती कायम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नसल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती, त्यानंतर तेल कंपन्यांनी आजपर्यंत दरात वाढ केलेली नाही.

मात्र मुंबई, बिहार, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये आजही पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत.

जाणून घ्या काय आहेत दर

दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आहे तर डिझेलचा दर 91.43 रुपये प्रतिलिटर होता.

कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 101.56 रुपये प्रति लीटर आहे.