अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  खासगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बस चालक जखमी झाला आहे.

मांगिलाल नानुराम परभार (वय 57 रा. उज्जैनी, मध्यप्रदेश) असे जखमी चालकाचे नाव आहे. अहमदनगर-मनमाड महामार्गावर पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.

याप्रकरणी जखमी मांगिलाल परभार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मांगिलाल परभार त्यांच्या ताब्यातील खासगी बस घेवुन मनमाड रस्त्याने प्रवास करत असताना समोरून आलेल्या कंटेनर चालकाने बसला धडक दिली.

या धडकेत बस चालक जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक फौजदार गायकवाड करीत आहे.