Maharashtra News : गेल्या काही महिन्यांपासून प्रखर हिंदुत्ववादी म्हणून पुढे येऊ पाहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गणेश विसर्जन पद्धतीवरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

त्यांनी गढूळ पाण्यात आणि चुकीच्या पद्धतीने विसर्जन केल्याचा आक्षेप घेत त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या.

नंतर मुर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केलं. ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी खूपच अस्वच्छ होतं.

नवनीत राणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी राणांना ट्रोल केलं आहे.

तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता मग गणपती विसर्जन कसं करतात हे तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न लोक राणांना विचारत आहेत. राणांची गणपती विसर्जनाची पद्धत अनेकांना खटकली आहे.