अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे,

आ.रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली असताना आज कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

फेसबुक पोस्ट मध्ये विवेक कोल्हे यांनी म्हंटले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारी म्हणून काही दिवस विलगिकरणात होतो.कोणतेही लक्षण नसतांनाही दुर्दैवाने माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

सध्या माझी प्रकृती व्यवस्थित असून पुढील उपचार घेत आहे.कोरोनाचे सावट आपल्या सभोवताली आहे.त्यामुळे आपणही सर्वांनी आपली काळजी घ्या.

आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद सोबत आहेत.काळजीचे कारण नाही.ज्यांचे कोविड लसीकरण बाकी असेल त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्या व काळजी घ्या असे म्हंटले आहे.