अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांच्या पाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.(Ahmednagar Corona positive)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास बुधवारी हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसापुर्वी हिवाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनादरम्यान काही मंत्री व आमदार यांच्यासह अधिवेशनास उपस्थित कर्मचारी, पोलिस व पत्रकार यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.

वाढता कोरोना संसर्ग विचारात घेत अधिवेशन संपवण्यात आले होते. या अधिवेशनानंतर बुधवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर आज गुरुवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याबाबत या दोन्ही नेत्यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती देत संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती.

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, आ. राधाकृष्ण विखे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनादेखील कोरोनाची बाधा झाली असून याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.