Maharashtra news : न्यायालयात अगर पोलिस चौकशीत माहिती दडवायची असेल तर आता आठवत नाही, लक्षात नाही, सांगता येणार नाही. अशी उत्तरे आरोपी किंवा साक्षिदारांकडून दिली जातात.

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी इडीच्या चौकशीत दिलेले उत्तर आता समोर आले आहे. “मला कोविड झाला आणि त्यामुळे माझी स्मरणशक्ती गेली आहे.” असे उत्तर जैन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले.

ईडीने जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी तसेच उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याबद्दल गेल्या महिन्यात अटक केली आहे. त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये ईडीने न्यायालयात तपासाबद्दल माहिती दिली आहे.

त्याध्ये म्हटले आहे की, जैन चौकशीत सहकार्य करीत नाहीत. प्रश्न विचारल्यानंतर “मला कोविड झाला आणि त्यामुळे माझी स्मरणशक्ती गेली आहे.” असे सांगत आहेत. चौकशी करणे बाकी असल्यानं कोठडी वाढवून मिळण्याची मागणी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी केली आहे.