अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- काेराेना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत बुधवारी संसर्गामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचा विक्रम पुन्हा माेडला गेला. बुधवारी महामारीमुळे एकाच दिवसात ३ हजार २६० जणांचा मृत्यू झाला.
२ लाख २६ हजार ७६२ नवे विक्रम समाेर आले.याआधी अमेरिकेत काेराेनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंचा विक्रम १५ एप्रिल राेजी नाेंदवण्यात आला हाेता. तेव्हा एका दिवसात २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला हाेता.
जवळपास संपूर्ण अमेरिकेत काेराेनामुळे संबंधित मृत्यूंची संख्या वाढली. सात दिवसांतील सरासरी मृत्यू २ हजार २४९ नाेंदवण्यात आले. हादेखील विक्रम आहे. मागील विक्रम १७ एप्रिलला नाेंदवण्यात आला हाेता.
तेव्हा सात दिवसांतील मृत्यूंची सरासरी २ हजार २३२ हाेती. दैनंदिन आकड्याच्या तुलनेत सात दिवसांतील स्थिती पाहिल्यास वास्तव नेमकेपणाने समाेर येते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये फायझरच्या लसीचा उपयाेग सुरू झाला आहे. कंपनीने अमेरिकेतही अर्ज दाखल केला आहे. येथे प्रशासन आपत्कालीन वापराच्या परवानगीवर विचार करत आहे.