कोरोना व्हायरस

आला रे आला…. कोरोनाचा नवा व्हेरियंटने ‘या’ देशात केला शिरकाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण अफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या नव्या वेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. देशातील वायरोलॉजिस्ट ट्युलियो डी ओलिवेरा यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत मल्टीपल म्युटेशन होणारा कोरोनाचा वेरियंट समोर आला आहे.

त्यानंतर युके कडून 6 अफ्रिकी देशांवर प्रवासावर अस्थायी रुपात बंदी घातली आहे. भारतात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी येणाऱ्या काळातील चिंता वाढली आहे.

कारण दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता मावळली असतानाच ही महत्वाची माहिती उघडकीस आलीय.

दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्‍यांनी घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष्य याकडे लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं काटेकोरपणे टेस्टिंग करायला सांगितलं आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेसह अन्य दोन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या नव्या वेरियंटला वैज्ञानिकांनी B.1.1.529 असे नाव दिले आहे.

तो वेरियंट ऑफ कंसर्न असल्याचे ही म्हटले. त्याचसोबत डब्लूएचओने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. ओलिवेरा यांनी पुढे म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमागील मुख्य कारण म्हणजे मल्टीमल म्युटेशन असणारा हा वेरियंट आहे.

केंद्रासह राज्यांना सतर्कतेचा सूचना दरम्यान, भारतात सुद्धा दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देशन दिले गेले आहेत.

तर केंद्र सरकारने राज्यांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. राज्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची नीट तपासणी करावी. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये.

Ahmednagarlive24 Office