अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-जगभरात कोरोनाने कहर घातला आहे. परंतु इटली पाठोपाठ आता अमेरिकेमध्ये कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले असून अमेरिकेत ‘जॉन हॉपकिन्स’ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १,००,०४७ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
अमेरिकेत २० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता. आतापर्यंत तब्बल १६ लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सगळी परिस्थिती भयानक असल्याचे म्हटले होते.
मात्र, सरकारने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे अधिक हानी टळल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, अनेक तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला छेद देणारे अंदाज वर्तविले आहेत. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरले आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये असलेल्या न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, इलिनोयस आणि मॅसेच्युसेटस या पाच राज्यांतील बळींची एकत्रित संख्या ५५ हजार इतकी आहे.
परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेतील ५० ते ६० लाख लोकांना कोरोनाची लागण होईल. तर १४ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com