अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सीडीएससीओच्या विषयतज्ज्ञ समिती (एसईसी) ने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या दोन्ही लसी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी शिफारस केली आहे.
यावर आता औषध महानियंत्रकांना (डीसीजीआय) अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. डीसीजीआयच्या परवानगीनंतर लवकरच दोन्ही लसी काही अटी-शर्तींवर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या नियमित विक्री करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे.
देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील.
सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे. रिपोर्टनुसार, जर कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला बाजारात विक्रीसाठी मान्यता देण्यात आली तर त्या CoWin वर रजिस्टर असलेल्या दवाखान्यात आणि रुग्णालयात उपलब्ध होतील.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या फार्मा कंपन्यांनी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे त्यांच्या संबंधित कोविड-१९ लसी म्हणजेच कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या नियमित बाजारात अधिकृत विक्रीला मान्यता मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते.
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी ३ जानेवारी रोजी मंजूर देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनच्या खुल्या विक्रीस मंजुरी मागतानाही अशाचप्रकारचा दावा करण्यात आला आहे. लसबाबत सर्व तपशील सादर करण्यात आला आहे. कोविडवरील ही स्वदेशी लसही भारताच्या लसीकरण मोहिमेत महत्त्वाची ठरली आहे.