सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून कधी एकदा कोरोना नष्ट होईल याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. आता यातच संशोधकांनी दावा केला आहे की, जगभरात थैमान घातलेला कोरोना पुढील 18 ते 24 महिने कायम राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या संशोधकांनी म्हटले आहे, हा आजार वेळोवेळी डोके वर काढू शकतो. अमेरिकेच्या मिनेसोटा यूनिव्हर्सिटीमध्ये सेंटर फॉर इंफेक्शियस डिजीज रिसर्ज अँड पॉलिसीकडून ‘कोव्हिड-19 व्ह्यूपॉइंट’ नावाने हे संशोधन करण्यात आलेले आहे.
हे संशोधन डॉ. क्रिस्टीन ए. मूर (वैद्यकीय संचालक सीआयडीआरपी), डॉ. मार्क लिपिसच (संचालक, सेंटर फॉर कम्युनिकेबल डिजीज डायनामिक्स, हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ), जॉन एम बॅरी (प्रोफेसर, तुलाने यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ) आणि माइकल टी ओस्टरहोम यांनी केले आहे.
संशोधकांच्या अंदाजानुसार उन्हाळ्यामध्ये कोरोनाची लाट येऊ शकते. ही लाट स्थानिक स्थिती, प्रसार रोखण्यासाठी उचलेली पावले याच्यावर निर्भर आहे. दुसऱ्या अंदाजानुसार, 2020 च्या हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येऊ शकते.
या दरम्यान प्रसार रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे. हे 1918-19, 1957-58 आणि 2009-10 महामारीच्या समान आहे.
तिसऱ्या अंदाजानुसार, 2020 च्या वसंतनंतर संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी होईल. यात इ.स.1700 पासून जगभरातील 8 इंफ्लूएंजा महामारींचा अभ्यास करण्यात आला आहे.
यातील इ.स.1900 च्या दशकानंतर 1900-1919, 1957, 1968 आणि 2009-10 मध्ये आल्या आहेत. संशोधकांचा दावा आहे की, सार्स आणि मार्स पेक्षा सार्स-कोव्ह-2 वेगळा आहे.
अभ्यासानुसार, इंन्फ्लूएंजा व्हायरस आणि कोव्हिड-19 व्हायरसमध्ये अंतर असले तरी साम्य देखील आहे. दोन्ही श्वसनाच्या नळीपासून पसरतात. दोन्ही लाखो लोकांना संक्रमित करण्यास आणि जगभरात वेगाने पसरण्यास सक्षम आहेत.