या देशात कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात ५७ हजार रुग्ण, लॉकडाऊनही होणार कडक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.

शनिवारी येथे ५७ हजाराहून जास्त रुग्ण समोर आले. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सोमवारी नव्या बाधितांची एका दिवसातील संख्या जास्त जास्त आढळून आले.

जॉन्सन म्हणाले, आगामी आठवड्यात शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ शकते. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३.५० लाखावर पोहोचली आहे.

शनिवारी अमेरिकेत २.९१ लाख रुग्ण समोर आहे. २ हजार ३७३ जणांनी प्राण गमावले. मलेशिया व इराणमधील स्थितीत सुधारणा झाली आहे. मलेशियाने महामारीच्या स्थितीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.

रविवारी मलेशियात १ हजार ७०४ रुग्ण आढळून आले. तेथे गेल्या तीन दिवसांत २ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले होते.

इराणमध्ये रविवारी ५ हजार ९६० नवे रुग्ण समोर आले. गेल्या सात दिवसांतील ही सरासरी संख्या आहे. ब्रिटनची यंत्रणा हादरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24