अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- राज्यातील सक्रिय रुग्णांच्या पहिल्या पाच जिल्ह्यात नगर जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत ४.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.( Ahmednagar Corona)
विशेष म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नंतर नगरमध्ये अधिक सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात नवे गुरुवारी २६ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
डिसेंबरपर्यंत सक्रिय रुग्ण २.७४ टक्के होते. आता ते ४.६२ टक्के आहे. नगर जिल्ह्यात गुरुवारी ५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ४०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.९१ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६१ इतकी झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५,
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६ आणि अँटीजेन चाचणीत ५ रुग्ण बाधित आढळले. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या पहिल्या पाच जिल्ह्यात नगर जिल्ह्याचा समावेश झाला आहे.