अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचा, ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसत आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात 5 ओमायक्रॉन रुग्ण होते, मात्र आता संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटचे आणखी रुग्णांची भर पडली आहे.
त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे.
त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे. राज्यात ‘ओमायक्रॉन’ची प्रकरणे अचानक वाढत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी पहिला रुग्ण आढळला होता.
आता महाराष्ट्रात कोरोना ‘ओमायक्रॉन’ प्रकाराचे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने रविवारी याबाबत माहिती दिली.
नायजेरियातील ४५ वर्षीय महिला तिच्या बारा आणि अठरा वर्षांच्या मुलींना घेऊन २४ नोव्हेंबरला भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली होती.
त्यांची व निकटच्या संपर्कातील १३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात नायजेरियातून आलेल्या तिघींसह या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड व सात वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने रविवारी सायंकाळी दिला.
या सर्वाना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वाची प्रकृती स्थिर आहे. सहा जणांपैकी नायजेरियातून आलेल्या महिलेला सौम्य लक्षणे असून, अन्य पाच जणांना कोणतीही लक्षणे नाहीत.
या बाधितांपैकी तिघे १८ वर्षांवरील असल्याने त्यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. सध्या या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.