कोरोना व्हायरस

खुशखबर! राज्यातील अभयारण्ये खुली होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारकडून आता विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत. यामध्ये अभयारण्यात पर्यटकांसाठी लादलेली बंदीही उठवण्यात आली आहे.

त्यामुळे 1ऑक्टोबरपासून राज्यातील जंगल सफारी पुन्हा सुरु होईल. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. मात्र यादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

मध्यंतरी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पाच दिवसांसाठी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली होती.

या प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती देण्यात आली होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते.

मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पूर्णपणे खुले होणार आहेत. पेंच , बोर अभयारण्य , उमरेड -पवनी- कऱ्हाडला याठिकाणी सर्वप्रथम जंगल सफारींना सुरुवात होईल.

Ahmednagarlive24 Office