देशातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती… केंद्राने राज्यांना दिल्या सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़

तसेच करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) बुधवारी देण्यात आली. जगभरात गेल्या आठवडय़ात नव्या करोनाबाधितांमध्ये १९ टक्क्यांची घट झाली असून मृत्यूची संख्याही स्थिर असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले.

दरम्यान करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़ गेल्या आठवडय़ात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली़ गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळल़े

दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले. सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत,

असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आह़े.

निर्बंध हळूहळू कमी करताना करोना प्रतिबंधासाठी चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि नियम पालन या पंचसूत्रीवर भर देण्याची गरज केंद्राने अधोरेखित केले आहे.