अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जगासह देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे.(Omicron) (colleges and theaters closed again)
देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढत असल्याने केजरीवाल सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. वाढत्या रुग्णांच्या याचपार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत लागू करण्यात आले निर्बंध काय, जाणून घ्या..
रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. शाळा, महिवाद्यालय बंद राहणार.
थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील.
दुकाने आणि वस्तू सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील.
आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त ५०% दुकानदारांना परवानगी असेल.
मेट्रो आणि बसेस ५०% क्षमतेने धावतील. रेस्टॉरंट्स ५०% क्षमतेसह सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडतील.
५०% क्षमतेसह बार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडतील.
सलून उघडता येतील. लग्न समारंभात फक्त २० लोकांनाच परवानगी असेल.
धार्मिक स्थळे खुली राहतील मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे.
सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी.
जगातील इतर देशांबरोबरच भारतामध्येही ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील १९ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. तसेच जगभरात तब्बल ११६ देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.