कोरोना व्हायरस

राहता तालुक्यात प्रत्येकी तासाला दोन कोरोनाबाधितांची भर पडली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

राहाता तालुक्यात 165 सक्रिय कोरोनाबाधित असून गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरात निर्बंध जारी केले आहेत. राहाता तालुक्यातही निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

सोमवार मध्यरात्रीपासुन हे निर्बंध अंमलात आले असुन हे निर्बंध मोडणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तहलिसदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. तहसीलदार हिरे म्हणाले, गेल्या 5-6 दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे. राहाता तालुक्यात या टप्प्यात करोनाने शंभरी पार केली आहे.

165 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. प्रवरा रुग्णालयाच्या करोना सेंटरमध्ये 30 हुन अधिक रुग्ण आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना करोना झाला असला तरी सौम्य लक्षणे त्यांच्यात दिसुन येतात. दरम्यान तालुक्यातील शाळा तसेच महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहातील.

इयत्ता 10 व इयत्ता 12 वी चे विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक बोर्डाकडून राबवायचे उपक्रम, प्रशासकिय कामकाज, व शिक्षकांनी अध्यापना व्यतिरिक्त करावयाचे कामकाज. या बाबी वगळण्यात आल्या आहेत. लग्न समारंभासाठी 50 व्यक्ति, अंत्यविधिसाठी 20 व्यक्ति, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय कार्यक्रमांनाही कमाल 50 व्यक्तिंना परवानगी असेल.

पत्येक कार्यालयात व्यावस्थापनाने थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनी दुसरा डोसही घ्यावा.

सध्या 15 ते 18 च्या पुढेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांनीच लस घ्यावी, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.

Ahmednagarlive24 Office