कोरोना व्हायरस

E-Challan : आता अशीही बसू शकते तुमच्या खिशाला कात्री,जाणून घ्या नाहीतर

Published by
Ahmednagarlive24 Office

E-Challan : देशात रोज कितीतरी अपघात घडत असतात. या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत होते तर काहीजणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. अशातच आता वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली जात आहे.

त्यामुळे वाहनचालकाने जर नियम मोडले तर त्यांचे ऑनलाईन चलन कापले जात आहे. त्यामुळे आपलेही ऑनलाईन चलन कापले आहे की नाही ते जाणून घेणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे तपासा

स्टेप 1

  • जर तुम्हाला रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमधून चलन कापले गेले की नाही ते तपासायचे असेल, तर तुम्हाला http://echallan.parivahan.gov.inया अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

स्टेप 2

  • वेबसाइटवर तुम्हाला चलन स्थितीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तेथे तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि वाहन चालविण्याचा परवाना क्रमांक असे तीन पर्याय मिळतील.

स्टेप 3

  • जर तुमच्याकडे कट केलेल्या चलनचा क्रमांक नसेल, तर तुम्हाला वाहन क्रमांकाचा पर्याय निवडून तो क्रमांक टाकावा लागेल.

स्टेप 4

  • तुम्हाला स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • Get Detail वर क्लिक करावे लागेल
  • तुम्हाला नंतर स्क्रीनवर तुमच्या किती चलनात कपात झाली आहे हे दिसेल.
  • तुम्ही ते ऑनलाइन भरू शकता.
Ahmednagarlive24 Office