धक्कादायक ! आता ‘हा’ आजार सहा महिन्यात घेऊ शकतो सहा लाख लोकांचा बळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जगभरात कोरोना थैमान घालतोय. भारतात सर्व उपाययोजना करूनही याचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. जगभरात साधारणतः तीन लाखांच्या आसपास नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी ७८ हजारांवर गेलीये. परंतु आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि यूएनएड्स (UNAIDS) ने अंदाज वर्तवला आहे की पुढील सहा महिन्यात आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे 5 लाख लोकांचा मृत्यू होईल.

दुर्दैवाने असं झाल्यास 2008 मध्ये एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटू शकतो . खरंतर 2010 पासून आफ्रिकेत अँटीरेट्रोव्हायरल (ARV) थेरपीमुळे HIV- AIDS संसर्गाचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले.

मात्र कंडोमची कमतरता आणि एआरव्ही थेरपी, टेस्टिंग किट इत्यादींचीही कमतरता यामुळे 2018 मध्ये 2.5 कोटी लोकांना HIV झाला होता.

यातील 64 टक्के अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपीच्यामी मदतीने बरे देखील झालेत. मात्र सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या खालावली आहेत.

आणि परिणामी HIV क्लिनिकमध्ये अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपी पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे येत्या सहा महिन्यात आफ्रिकेत तब्बल पाच लाख लोकांचा एड्समुळे मृत्यू होऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24