धक्कादायक : लसीचे दुष्परिणाम; डॉक्टर सोबत झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-मेक्सिकोमध्ये एका महिला डॉक्टरने अमेरिकन कंपनी फायजर-बायोएनटेकची लस घेतल्यानंतर प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लस घेतल्यानंतर डॉक्टरला श्वास घेणे कठीण झाले होते. सोबतच फिट्सही येत होत्या. त्वचेला खाज सुटली आणि इतर समस्याही दिसून आल्या.

नूएवो लियोनमधील एका सरकारी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे पुरावे सापडले नाहीत.

कोणत्याच व्यक्तीच्या मेंदूत सूजही दिसली नाही. मात्र, ज्या महिला डॉक्टरमध्ये कोरोना लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहे, तिला अॅलर्जिक रिअॅक्शन होत होती.

या महिला डॉक्टरला सुरुवातीला एन्सेफॅलोमेलायटिस असल्याचे निदान झाले. ज्यामध्ये मेंदू आणि मणक्याला सूज येते. मेक्सिकोमध्ये २४ डिसेंबरपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचा पहिला टप्पा सुरू झाला होता.

भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनबाबत एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारत हा जगातील असा एकमेव देश बनला आहे ज्या देशाला नव्या स्ट्रेनला वेगळे करण्यास यश मिळाले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबतची माहिती दिली. आयसीएमआरने ट्विट करून म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराला (स्ट्रेन) भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केले आहे.

‘कल्चर’ ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत पेशींना नियंत्रित परिस्थितीमध्ये वाढवले जाते आणि सामान्यत: त्यांच्या नैसर्गिक वातावरणातून त्यांना बाहेर काढले जाते.

अहमदनगर लाईव्ह 24