चक्क डॉक्टरने कोरोनाची लस चोरून दिली कुटुंबीयांना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- अमेरिकेत टेक्सास राज्यातील ह्युस्टन आरोग्य विभागातील एका डॉक्टरवर कोरोना लसीचे ९ डोस चोरून ते आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या आरोपानंतर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. लसीची एक बाटली खराब झाल्यामुळे यातील डोस वाया जाऊ नये, या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा या डॉक्टरच्या वकिलाने केला आहे.

ह्युस्टन सार्वजनिक आरोग्य विभागातील हसन गोकल (२९) नामक आरोग्य कर्मचाऱ्याने २९ डिसेंबर रोजी ह्युस्टन पार्क येथे लसीकरण अभियान सुरू असताना कोरोनावरील मॉडर्नाच्या लसीची एक बाटली चोरल्याचा आरोप आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

हसनने लसीची बाटली चोरल्यानंतर स्वत:च्या पत्नीसह ९ लोकांना डोस दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार लसीकरणात भाग घेणाऱ्या लोकांना डावलून गोकलने स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत कुटुंबाला प्राधान्य दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने केलेल्या अंतर्गत चौकशीनंतर हसन यांना निलंबीत केले आहे. आरोप सिद्घ झाल्यास गोकल यांना एक वर्षाची शिक्षा व तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24