अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते.(corona patients increase)
त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये आणखी ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तहसीलदार आवळकंठे यांनी दिली.
नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले. तर विद्यालयातील इतर ४१० विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली.
या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली. मात्र विद्यालयाने त्यांना शाळेतच ठेवले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी २७ व शनिवारी २५ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव आली आहे.
त्यामुळे आता पहिल्या दिवशी १९ आणि नंतर ५२असे एकूण ७१ पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या झाली आहे. या परिसरात उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे रविवारी या विद्यालयास भेट देणार आहेत.