अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मलेरियाविरोधातील औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. कोरोनाविरोधी लढ्यात वैद्यकीय आणीबाणीत सैन्यदलाचा सहभाग वाढविण्याची गरजही यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केली.
सर्जिकल मास्क हे कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात कपड्यापासून तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करावा.
रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने लोकांसाठी सर्जिकल मास्कची शिफारस केली नाही. अशा स्थितीत नागरिकांसाठी घरगुती मास्क किंवा ऑनलाइन माध्यमातून खरेदी करण्यात आलेले साधारण मास्क फायदेशीर ठरतील, असे ट्रम्प म्हणाले.
परंतु आपण मात्र मास्कचा वापर करणार नसल्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. ओवल कार्यालयात बसून मला विविध देशांच्या राष्ट्रपती, हुकूमशाह, राजा आणि महाराणीसोबत चर्चा करावी लागते.
त्यामुळे मास्क लावून बसणे योग्य ठरणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी लोकांना सतत हात धुवत राहण्याचे आवाहन केले आहे. सीडीसीनेदेखील सर्वांनी मास्क वापरावा, असा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे मलेरियाविरोधातील हाइड्रोक्सी क्लोरोक्वाइन औषधी कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आणखी सखोल अभ्यास सुरू आहे. यासंबंधीची माहिती लोकांना दिली जाईल, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com