अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- समपयण जगात कोरोना पसरला आहे. जगाची आर्थिक चक्रे त्याने थांबवली आहेत. जगाच्या पाठीवर जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे आढळली आहेत.
अशामध्ये तैवान या देशात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचं एकही कोरोना रुग्ण सापडलेला आंही . युरोप, अमेरिका आणि भारतात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असताना
तैवानमध्ये गेले 200 दिवस कोरोनाचं लोकल प्रकरण सापडलं नाही. त्याही कारणेही तशीच आहेत. एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होताच तैवानने सावध पावले उचलायला सुरुवात केली.
तैवानने सुरुवातीलाच आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. तसंच देशांतर्गत प्रवासावरही लक्ष ठेवलं होतं. त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. क्वारंटाइनसाठी योग्य नियमिम बनवले.
मास्क बंधनकारक केलं. वुहानच्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. चीन, हाँगकाँग आणि मकाऊमधन येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तैवानमध्ये 21 जानेवारीला कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळलं. तैवानमध्ये शेवटचा कोरोनाचं लोकल रुग्ण 12 एप्रिलला सापडला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved