file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  मालमत्ता कर थकीत असल्याने अहमदनगर महानगरपालिकेने 29 डिसेंबर रोजी मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई केली आहे.(AMC News)

याबाबत अधिक माहिती अशी कि, वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील करण्यात आली.

मालमत्ता करा पोटी 15 लाख 18 हजार 245 रूपये थकबाकी होती. कर थकविल्याप्रकरणी मनपाने ही कारवाई केली आहे.

प्रभाग अधिकारी सुनील. बी. साठे व प्रभारी कर निरीक्षक एस. के. दगडे व कर्मचारी शाम सुदाम शिंदे, इरफान सय्यद व अशोक गुलदगड यांच्या पथकाने केली.