अहमदनगर क्राईम

हॉस्पिटलचे मेडिकल फोडून २१ लाखांची रक्कम लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर शहरातील मोरगे हॉस्पिटलचे मेडिकल फोडून अज्ञात दोघा चोरट्यांनी सुमारे २१ लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर डॉ. मोरगे हॉस्पिटलच्या ग्राऊंड फ्लोअरवर मेडिकलचे दुकान आहे.

मध्यरात्री ३ च्या सुमारास तोंड बांधलेले अज्ञात दोन चोरटे मोटारसायकलवर या ठिकाणी आले. भिंतीवरुन उडी टाकून दोघांनी आत प्रवेश केला. बाहेरच असलेल्या वॉचमनला एकाने चाकू दाखवून चूप केले.

तेवढ्यात दुसऱ्याने कटरच्या सहाय्याने या मेडिकलच्या शटरला असणारे दोन्ही कुलूप तोडले. कुलूप तोडल्यानंतर शटर उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरने चोरटयांनी मेडिकलमधील ड्रॉवर उघडले.

ड्रॉव्हरमधील सुमारे २१ लाखाची रोकड पिशवीत भरुन चोरटे फरार झाले. या ठिकाणाहून बाहेर पडण्याअगोदर चोरट्यांनी सीसीटीव्हीचे शुटींग ज्या मशिनमध्ये रेकॉर्ड होते ते मशिनही चोरुन नेले.

जातांना वॉचमनला मागे न येण्याचाही दम देत चोरटे या ठिकाणाहून पळून गेले. याबाबत ज्ञानदेव मोरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डिवायएसपी संदीप मिटके, पोनि सानप यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office