Ahmednagar Crime : दारुची नशा ठरली २८ हजारांना चटका देणारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : दारुची नशा वाईट असते, याचा प्रत्यय एका मराठवाड्याच्या युवकाला आला. दारू पिण्यासाठी पिंपळवाडी रोडवरील एका दारुच्या अड्डयावर गेला असता एका दारुड्याने या युवकाच्या हातावर बाटली फोडून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पोबारा केला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मराठवाड्यातील पाचोड येथील घुले हा तरूण मुंबई येथून शिर्डीत आला होता. त्याला दारुचे व्यसन असल्याने दर्शन झाल्यानंतर गावाकडे जाण्याअगोदर २९ ऑगस्ट २०२३ रोजी तो एका पिंपळवाडी रोडवरील दारु अड्डयावर गेला.

पिल्यावर पैसे देताना काढलेला ६ हजाराचा बंडल व हातात असलेला २२ हजाराचा मोबाईल यावर एकाची नजर पडली. यावेळी त्याने हातावर बाटली फोडून दोन चार फटके दिले व तो पसार झाला. डोळ्यादेखत २८ हजाराला फटका बसल्याने तक्रार देण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये गेला; मात्र कशाला दारु पिला,

असे दादाने विचारल्याने गावाकडे राखी बांधण्यासाठी कसे जायचे ? या विचारात तो शिर्डी पोलिस स्टेशन परिसरात फिरत होता. दारुची नशा या युवकाला २८ हजाराला चटका लावणारी ठरली आहे.