Ahmednagar Crime : कारागृहातून आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या ५ जणांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : संगमनेर येथील दुय्यम कारागृहाचे गज कापून पलायन करणाऱ्या कैद्यांना मदत करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेरच्या कारागृहातून पळून गेलेल्या ४ आरोपींना दुसऱ्या दिवशीच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अटक करण्यात आली होती.

या आरोपींना मदत करणाऱ्या ३ आरोपींना शनिवारी रात्री तर दोन आरोपींना काल रविवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. आरोपींना मदत करणाऱ्या सर्व ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत.

या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींना पलायन करण्यासाठी मदत करणाऱ्या कलीम अकबर पठाण (रा. संगमनेर, प्रथमेश राऊत (रा. घुलेवाडी), हलीम अकबर पठाण (रा. संगमनेर ) या तीन आरोपींना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती.

मुख्य आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे गाडीच्या नंबर प्लेट काढण्यासाठी मदत करणे, आरोपींना कोर्टामध्ये तारखेवर हजर केले असता चोरून लपून चर्चा करून पुढील प्लॅन ठरवणे, आरोपींना पळून जाने कामी पैशाची व्यवस्था करून देणे आदी प्रकारची मदत केली आहे.

मुख्य आरोपीसोबत हे आरोपी देखील यापूर्वी वेगवेगळ्या वेळी कारागृहामध्ये बंदिस्त होते. त्या दरम्यान त्यांच्यामध्ये ओळख झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.